आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
आष्टी उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडनिंब शहराला पाणी मिळाले

माढा/ज्ञानप्रवाह न्यूज : माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे मोडनिंब शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता केली कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोडनिंब शहराला पाणी प्रश्नाला न्याय मिळाला असल्याने नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोडनिंब शहर आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा संपली असून आमदार अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा केल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजनेतून डाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले.

या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे,आनंद पाटील,डॉ.सागर गिड्डे, बाळासाहेब पाटील,बालाजी पाटील, शिवाजी सुर्वे,दिपक सुर्वे,गौतम ओहोळ, गोटु शिंदे,विजयसिंह गिड्डे,संतोष मुटकुळे,संभाजी काळे,अख्तरभाई तांबोळी, आकाश कोळी, संभाजी लादे,नंदकुमार लादे,प्रकाश कोळी, संचालक संदीप खारे, सचिन वाघाटे यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले.
मोडनिंबसाठी हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
