[ad_1]

US News: अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या शरीरावर गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.
ALSO READ: महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी 5 सरकारी योजना
मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील जी प्रवीण हा तरुण अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात मृतावस्थेत आढळला. प्रवीणच्या शरीरावर गोळ्या लागल्या आहे, परंतु त्याच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. प्रवीणच्या कुटुंबीयांनी बुधवारी या दुःखद घटनेची माहिती दिली.
प्रवीण मिलवॉकीमध्ये मास्टर ऑफ सायन्स (एमएस) करत होता. बुधवारी सकाळी त्याने त्याच्या वडिलांना फोन केला होता. पण, जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा त्याचे वडील झोपले होते आणि त्यांनी फोन उचलला नाही. नंतर, भारतीय वेळेनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रवीणच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली.
ALSO READ: गडचिरोलीमध्ये ८ लाखांचे बक्षीस असलेले दोन नक्षलवादींना अटक
विद्यार्थी प्रवीणचा मृत्यू कसा झाला?
प्रवीणचे नातेवाईक अरुण म्हणाले की, काही मित्रांनी प्रवीणच्या शरीरावर गोळ्या लागल्याची माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले की, काही लोकांनी सांगितले की अज्ञात हल्लेखोरांनी एका दुकानात घुसून प्रवीणवर गोळ्या झाडल्या, परंतु हत्येचे कारण काय होते हे स्पष्ट झालेले नाही.
ALSO READ: मुंबई लोकलमध्ये फॅशन डिझायनरचा विनयभंग, १२ दिवसानंतर आरोपीला अटक
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
