IND vs AUS : भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून केलं बाहेर

[ad_1]

Ind vs Aus
IND vs AUS Champions Trophy Semi Final 2025: विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव करून सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला.

ALSO READ: रोहित शर्मावर विनोद काँग्रेस प्रवक्त्या शमा यांना महागात पडला, बीसीसीआयने दिले चोख उत्तर

यासह, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. 

ALSO READ: भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतचे लॉरेस वर्ल्ड कमबॅक पुरस्कारासाठी नामांकन, मिळू शकतो मोठा सन्मान

आज भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरले होते पण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 265 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले.

ALSO READ: दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला

विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. 

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading