मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु श्री विठ्ठल चरणी केली अर्पण

मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु दान

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, ता.19- मोलमजुरी करणाऱ्या श्रीमती शकुंतला एकनाथ वाघ रा.मजरे ता.चाळीसगाव जि. जळगाव येथील रहिवाशी असून त्यांनी 18 मे रोजी मंदिर समितीस एक लाख 41 हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू दान केल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

या महिला भाविकाचा मंदीर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते श्रीची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे,डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे,ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर,ॲड.माधवी निगडे,ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.

श्रीमती वाघ यांचे लग्न झाल्यानंतर काही कारणास्तव पतीने त्यांना विभक्त केल्याने त्या भाऊ तुकाराम एकनाथ वाघ यांचेकडे राहायला गेल्या व उदरनिर्वाहासाठी त्यांनी मोलमजुरी करून मजरे या गावी २ एकर जमीन खरेदी केली.त्या जागी सन २०१८ मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर स्वखर्चाने उभारले व फाल्गुन शुद्ध २ या दिवशी मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण केले आहे. दरवर्षी या तिथीला पांडुरंगाचा वाढदिवस तेथे साजरा केला जातो. तसेच त्या दिवसापासून सात दिवसाच्या भागवत सप्ताहाचे आयोजन देखील केले जाते.

त्यांनी मोलमजुरी करून आपल्या जमापुंजीतून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास २ तोळे लगड (तुकडा) सोने दान करून आपली इच्छा पूर्ण केली आहे. सदर वस्तूची किंमत एक लाख 41 हजार होत आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading