[ad_1]

Prime Minister Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १ मार्चपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहे. आज ते जुनागड जिल्ह्यातील सासन येथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.
ALSO READ: फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाला स्थगित केलं
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून म्हणजेच शनिवार, १ मार्चपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर, ते जामनगरमधील रिलायन्स फाउंडेशनच्या प्राणी बचाव केंद्र, वंतारा येथेही भेट देतील. पंतप्रधान श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचे अध्यक्षस्थान देखील करतील. पंतप्रधान मोदींच्या वेळापत्रकानुसार, ते येत्या रविवारी, २ मार्च रोजी जामनगर येथील प्राणी संगोपन केंद्र वांतरा येथे भेट देतील आणि दुसऱ्या दिवशी जंगल सफारीचा आनंद घेतील. या संदर्भात, गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन दल प्रमुख ए पी सिंग यांनी माहिती दिली की, गिर राष्ट्रीय उद्यानाचे मुख्यालय असलेल्या सासन येथे वास्तव्यादरम्यान, पंतप्रधान मोदी जगप्रसिद्ध सोमनाथ मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचे अध्यक्षस्थान देखील करतील.
ALSO READ: मी ऑटो चालवायचो… अडीच वर्षांपूर्वी मी मर्सिडीजला ओव्हरटेक केले, शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटातील कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
