चंदुकाका सराफ प्रा.लि. पंढरपूरमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न

198 वर्षांची गौरवशाली परंपरा जपणारी व बारामतीची सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा.लि.पंढरपूर मध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ता.१७/०५/२०२४- 198 वर्षांची गौरवशाली परंपरा जपणारी व बारामतीची सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा.लि.पंढरपूर मध्ये आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेमध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

ही स्पर्धा चित्रकलेचे शिक्षक अमित वाडेकर, विलास जोशी सर व अण्णासाहेब व्यवहारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या स्पर्धेसाठी वेगवेगळे वयोगट करण्यात आले होते.

या स्पर्धेतील 6 ते 9 वयोगटातील प्रथम क्रमांक स्वरा सुरेंद्र कवडे ,द्वितीय क्रमांक अजनेश अतिश पवार ,तृतीय क्रमांक रिशान सरडे व 9 ते 12 वयोगटातील प्रथम क्रमांक जय सचिन साळवे, द्वितीय क्रमांक सिया शाहू सतपाल ,तृतीय क्रमांक संध्या महादेव भोसले या विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले .

या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या स्पर्धेला चंदुकाका सराफ प्रा.लि. पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक दिपक चव्हाण, बंडू गोफणे, ऑपरेशन मॅनेजर अनिल वठारे , फ्लोअर मॅनेजर संदीप पवार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण काळे यांनी केले होते.या स्पर्धेचे व्यवस्थापन रणजित सावळे,संजय सावळे,सागर मोरे, विनायक पवार, गणेश पाटील,सागर गोटे यांच्यासह सर्व महिला आणि पुरुष कर्मचार्यांनी केले होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading