अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन
आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या माढा तालुक्यातील अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन दि.२६ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आनंदबापू पाटील, संतोष मुटकुळे, यशवंत शिंदे,काकासाहेब पाटील, सरपंच दिपक ताकतोडे, संचालक विठ्ठल पाटील,विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील यांनी नवीन सबस्टेशन मुळे अरण व परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि अखंडित वीजपुरवठा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
अनेक वर्षांपासून माढा विधानसभा मतदार संघातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात होते. अभिजीत पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्या नंतर येथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर अरण येथील नागरिकांनी आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे सब स्टेशन उभारण्याची मागणी केली होती. आमदार पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून काम मार्गी लावल्याने येथील नागरिकांचा विजेचा प्रश्न कायमचा संपलेला आहे.यामुळे नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
