सिध्देवाडी सेंद्रिय शेतीचे रोल माॅडेल करा-पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी

सिध्देवाडी सेंद्रिय शेतीचे रोल माॅडेल करा-पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ सुरू होत आहे.सिध्देवाडी सेंद्रिय शेतीचे रोल माॅडेल करा,असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथे आज जिल्हास्तरीय सेंद्रीय शेती कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी पोलिस उप अधिक्षक डॉ अर्जुन भोसले,पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,सरपंच रोहिणी जाधव,पोलिस दत्तात्रय जाधव,उप सरपंच आनंदा जाधव,दीपक भालेकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष समाधान जाधव,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी चौधरी, कार्यक्रम अधिकारी केंद्रे प्रमुख उपस्थित होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग,कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,ग्रामपंचायत सिध्देवाडी, कै. स्वाती जाधव महिला फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सेंद्रीय शेतीचे रोल माॅडेल करा – जिल्हा पोलिस अधिक्षक कुलकर्णी

सिध्देवाडी गावात शेतकर्यांनी दोन गुंठे स्वत:साठी ही मोहिम राबविणेत येत आहे. यासाठी सर्व तांत्रिक सहाय्य करणेस टीम तयार आहे.घरगुती स्तरावर परसबागांचे नियोजन करा.स्वतः चे घरासाठी भाजीपाला निर्माण करा.सध्या युवकांचे माध्यमातून अन्न सुरक्षा व विषमुक्त शेतीचे प्रयोग सुरू करा. यामध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा आहे.

माण नदी काठांवर बांबु लागवड करा

नदीकाठाची जमिनीची धुप थांबविण्यासाठी बांबू लागवड व वृक्षारोपण करा,नदीकाठी स्वच्छता मोहिम राबवा.पर्यावरण चांगले राहण्यासाठी देशी वृक्ष लावा.रोजगार हमी योजना व वनीकरण विभाग,ग्रामपंचायत एकत्रित कृती संगम करा. या मोहिमेसाठी स्वतः येण्यास तयार असल्याचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. आज माण च्या तिरावर सोमलिंग मंदिर परिसरात पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते वृक्षारोपण केले.नंतर त्यांनी माण नदीकाठाची फिरून पाहणी केली.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन कटीबध्द

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ॲप तयार करता आहोत.मुलींनो निर्भयपणे शिक्षण घ्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन कटीबध्द आहे असेही पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

स्वागत रमांकात गायकवाड यांनी केले.या प्रसंगी महिला बचतगटाचे सदस्या व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांना देशी भाजी पाला बियाणे चे वाटप पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते करणेत आले.प्रास्तविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.

प्रास्तविक भाषणात रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी व विषमुक्त शेतीसाठी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव मध्ये राबविलेला सेंद्रीय शेतीचा उपक्रम सिध्देवाडी गावात राबवित आहोत. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे सहकार्य घेत असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य संगिता सुरेश गोडसे, बेबीनंदा बाबुराव गोडसे,आप्पा जाधव, रमेश बनसोडे,विजय जाधव,भास्कर जाधव, सरपंच सौ रोहिणी सारंग जाधव,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सारंग जाधव,ग्रामसेवक महादेव भुसे,सौ.दैवशीला घुले पोलीस पाटील चिचुंबे ग्रामपंचायत सदस्य, सिद्धेश्वर जाधव, सुरेश गोडसे,रमेश बनसोडे,ज्ञानेश्वर यशवंत गडदे, बालाजी जाधव, किरण जाधव,चंद्र दिपक भालेकर गुरुजी,एम बी जाधव गुरुजी, पांडुरंग जाधव, समाधान जाधव (तंटामुक्त अध्यक्ष) बजरंग जाधव यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमांकात गायकवाड यांनी केले.आभार एम बी जाधव यांनी मानले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading