छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ. समाधान आवताडे यांची मागणी

छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ.समाधान आवताडे यांची मागणी

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी केलेल्या अद्वितीय बलिदानाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्त्रोत आहेत.त्यांच्या जीवना वर आधारित हा चित्रपट केवळ मनोरंजना पुरता मर्यादित नसून,तो देशभक्तीची जाणीव जागृत करणारा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.चित्रपटगृहां मध्ये लागू असलेल्या करांमुळे सर्वसामान्य नागरिकांना हा ऐतिहासिक चित्रपट पाहणे कठीण होत आहे. तरी छावा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) केला गेला, तर जनसामान्यांपर्यंत हा प्रेरणादायी इतिहास सहज पोहोचू शकेल. त्यामुळे या चित्रपटावर लावलेले कर रद्द करावेत अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

हा चित्रपट करमुक्त केल्यास महाराष्ट्रातील जनतेला आपल्या इतिहासाची जाणीव होईल आणि छत्रपती संभाजी महाराजांचे महान कार्य नव्या पिढीपर्यंत सुलभतेने पोहोचेल.तरी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन ‘छावा’ चित्रपट करमुक्त करावा, अशी विनंती आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही चित्रपटांवर कर लावण्यात येत नसून सर्व चित्रपट करमुक्तच केलेले आहेत.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading