नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला,तेलंगणा एक्सप्रेसमधील प्रवासी थोडक्यात बचावले

[ad_1]


रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला. रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास, इंधनाने भरलेल्या मालगाडीच्या सुरुवातीच्या डब्यातून आगीची ठिणगी निघाली आणि त्यातून ज्वलनशील पदार्थांचा कारंजा बाहेर पडला.

ALSO READ: दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला
स्फोटासारख्या आवाजानंतर, कारंज्यातून निघालेला इंधनाचा फवारा फलाट क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या हैदराबाद-दिल्ली तेलंगणा एक्सप्रेसकडेही गेला. यामुळे स्टेशनवर काही काळ गोंधळ उडाला आणि प्रवाशांना मोठा अपघात होण्याची भीती वाटली. काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत तेलंगणा एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली.

ALSO READ: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीला जोडलेला टँकर इंधन घेऊन रतलाम जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील तडाली येथे जात असताना नागपूर रेल्वे स्थानकावर आग लागल्याचे समोर आले. ही माहिती मिळतातच रेल्वे अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यावेळी फलाटावर तेलंगणा एक्सप्रेस उभी होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळण्याने ही आग मालगाडीच्या टँकर पर्यंत पोहोचली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

ALSO READ: बाळ दूध पीत नाही, नैराश्यात येऊन आईने घेतले टोकाचे पाउल, नागपुरातील घटना
रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागण्याचं समजतातच स्थानकावर गोंधळ उडाला. 

Edited By – Priya Dixit

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading