पंढरपूर पंचायत समिती बीडीओ व ग्रामसेवकांवर कलम 92 प्रमाणे शहर पो. ठाणे येथे गुन्हा दाखल करा- प्रहारची मागणी

पंढरपूर पंचायत समिती बीडीओ. व ग्रामसेवकांवर कलम 92 प्रमाणे शहर पो. ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रहारची मागणी

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – दिव्यांगांना पंढरपूर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायती ने 5% अपंग निधी वाटप करणे बंधनकारक असताना बर्याच ग्रामपंचायच्या ग्रामसेवकांनी हा निधी वाटप केलेला नाही.गटविकास अधिकारी यांना वारंवार लेखी अथवा तोंडी निवेदन देऊनही याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष केले जात आहे.अनेक वेळा उपोषण,आत्मदहनसारखी आंदोलनेही करण्यात आली.त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर बीडीओ यांनी प्रहार संघटनेला पत्र देऊन मिटींगला बोलावले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकही उपस्थित होते. परंतु प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये व ग्रामसेवकांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे संघटनेला आढळून आले.

त्यानंतर प्रहारचे पदाधिकारी, बीडीओ व ग्रामसेवकांमध्ये बाचाबाची झाली.त्यानंतर लागलीच ग्रामसेवक भुजबळ व इतर जणांनी प्रहार संघटनेचा निषेध व्यक्त करत प्रहार संघटनेवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी काम बंद आंदोलन सुरु केले आणि दिव्यांगांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला व पुन्हा निधी संदर्भात आमच्याकडे यायचे नाही असे बीडीओ यांनी दिव्यांगांना सांगितले.

त्यानंतर आम्हाला लेखी पत्र देऊन बोलावले व आम्हाला हीन दर्जाची वागणूक देऊन आर्वाच्य भाषा वापरली म्हणून प्रहार संघटनेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात बीडी ओ तसेच ग्रामसेवक भुजबळ यांच्यासह इतरांवर कलम 92 नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन व अर्ज दिला आहे. जर त्यांचेवर गुन्हा दाखल करून घेतला नाहीतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्या तील दिव्यांग पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आंदोलन करतील असा इशारा प्रहार दिव्यांगक्रांती महिला अध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी दिला आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading