मा.आ.प्रशांत परिचारक यांना पितृशोक
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०२/२०२५ – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ॲड.प्रभाकरराव उर्फ बाबा रामचंद्र परिचारक (वय- 95) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक व महेश परिचारक हे तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे थोरले बंधू असणाऱ्या प्रभाकर परिचारक यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात खंबीरपणे पाठीमागे राहून मोठी जबाबदारी पार पडली होती.

पंढरपूर येथील न्यायालयात काही वर्ष त्यांनी वकील म्हणूनही काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंढरपूर शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. येथील वैकुंठ स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
