संताची शिकवण,संताचे वर्तन,संतांचे आचरण अंगीकारण्यासाठी संस्कृती टिकविण्यासाठी संतांची संगती करा-हभप ॲड. जयवंत महाराज बोधले

स्व.वसंतदादा काळे यांच्या 23 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09- चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व.वसंत(दादा) काळे यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्यावतीने हभप ॲड.जयवंत महाराज बोधले यांचे शुभ हस्ते आदरणीय दादांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र वाहुन किर्तन सोहळ्यास सुरुवात केली.संताची शिकवण, संताचे वर्तन,संतांचे आचरण अंगीकारण्यासाठी संस्कृती टिकविण्यासाठी संतांची संगती करा, असे आपल्या किर्तनातुन त्यांनी सांगितले.

कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्यावतीने जयंती / पुण्यतिथीचे विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम साजरे केले जातात.गतवर्षाप्रमाणे यावर्षीही हभप जयवंत महाराज बोधले यांचे किर्तन व पुष्पवृष्टी सोहळा साजरा करण्यात आला.

कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते जयवंत महाराज बोधले यांचा सत्कार करण्यात आला.ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांचा सत्कार व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांचे हस्ते आणि ह.भ.प. वसंत महाराज कौलगे-पिराचीकुरोली, ह.भ.प. तात्या महाराज चौगुले-भाळवणी, ह.भ.प. शंकर महाराज चव्हाण-आढीव, ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे-सुपली, ह.भ.प. माधव भिंगारे-नांदोरे, ह.भ.प.ॲङ मंगेश महाराज उपासे-पटवर्धनकुरोली यांचा सत्कार कारखान्याचे संचालकांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतलेले नारायण शिंदे-देवडे यांचा तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले धनश्री परिवाराचे जनक शिवाजीराव काळुंगे सर यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कारखान्याच्या संचालिका मालनबाई काळे, संचालक सर्वश्री परमेश्वर लामकाने, अमोल माने, राजाराम पाटील, गोरख जाधव, अरुण नलवडे, योगेश ताड, माजी संचालक राजाराम माने, पंचायत समिती सदस्य्‍ सरेश देठे, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, व इतर मान्यवर, कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading