सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेद चिकित्सा शिबीराचे आयोजन
बालरंगभूमी परिषदेचा आगळावेगळा उपक्रम…

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था बालरंगभूमी परिषद,शाखा- सोलापूर,फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया,सोलापूर आणि लिमये निसर्गोपचार व डॉ.प्रांजली मार्डीकर यांच्या सहकार्याने सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आयुर्वेद चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ब्लडप्रेशर,शुगर, H.B, जनरल चेकअप करून उपचार व मार्गदर्शन केले जाईल तसेच आयुर्वेद चिकित्सा सुद्धा या शिबिरात केली जाणार आहे.तरी सोलापुरातील कलावंतांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन अध्यक्ष सीमा यलगुलवार बालरंगभूमी परिषद,शाखा -सोलापूर यांनी केले आहे.
शुक्रवार दि. 07.02.2025 स. 11 ते दु.1 वाजेपर्यंत चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला, रत्नदीप हौसिंग सोसायटी शेजारी विकास नगर, होटगी रोड सोलापूर येथे होणार आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
