भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ तीर्थकारांची स्थापना ,१ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी अखेर पंचकल्याणक प्रतिष्ठेचे आयोजन
आचार्य शिरोमणी १०८ विशुद्ध सागर महाराज ससंघ तसेच आचार्य सुयोग सागर महाराज ससंघ यांच्या उपस्थितीत पंचकल्याणक

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : बांधकामात कोणत्याही प्रकारच्या
लोखंडी व लाकडी वस्तूचा वापर न करता केवळ राजस्थानी मकराना मार्बलमध्ये आढीव ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे अजोड कलाकृतीने व आकर्षक अशा मंदिराची निर्मिती केली असल्याची माहिती पंढरपूर येथील डॉ.शीतल शहा यांनी दिली आहे.डॉ.शीतल शहा यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.
४० बाय ८० लांबी रुंदीचे मंदिर तयार केले आहे. या मंदिराचे बांधकाम नऊ महिन्यांत झाले आहे. मंदिरासाठी लागणारा मार्बल पाषाण मखराना शहरातून आणून तेथेच राजस्थानी कारागिरांमार्फत कोरीव काम करून सुबक कलाकृतीने मंदिराची उभारणी केलेली आहे.

या मंदिरामध्ये भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ तीर्थकारांची स्थापना करण्यात येणार आहे.१ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी अखेर या मंदिरात पंचकल्याणक प्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आले आहे.जैन धर्म शास्त्रानुसार जैन गुरूंच्या सानिध्यातच व मंत्रोच्चारा द्वारे स्थापना करावी,असे असल्याने पंचकल्याण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
पंचकल्याण प्रतिष्ठेसाठी संपूर्ण भारतातून व महाराष्ट्रातून जवळपास सहा ते सात हजार श्रावक श्राविका उपस्थित राहणार असल्याचे डॉ.शीतल शहा व त्यांच्या पत्नी सौ.सुषमा शहा यांनी सांगितले.
जैन धर्मगुरू आचार्य शिरोमणी व अध्यात्मक योगी १०८ विशुद्ध सागर महाराज ससंघ ३० महाराज व आर्यिका येत आहेत.तसेच आचार्य सुयोग सागर महाराज ससंघ या पंचकल्याणकासाठी उपस्थित राहणार आहेत असे सांगून डॉ शितल शहा यांनी सर्व श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्म लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
