AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स दुधारी तलवार – ॲड.चैतन्य भंडारी

AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स दुधारी तलवार – ॲड.चैतन्य भंडारी

जितके फायदे तितकेच धोकेही जास्त

धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल अनेकांना माहित झालेलं आहेच. जे काम मेंदूही सक्षमपणे करू शकत नाही ते काम हे नवे तंत्रज्ञान करून देतेय.आधी तर आपल्याला लोकेशन मॅपवाल्या बाईचे कौतुक वाटायचे की कसे काय ती बरोबर आपल्याला योग्य लोकेशनवर नेते.ते नंतर सवयीचे झाले आणि नंतर अलेक्साबाईचे आगमन झाले. एखाद्या पीए सारखी ती तुमची कामे करू लागली.तेही दांड्या न मारता आणि बिनचूक त्यामुळे लोक एकदम खुश झाले आणि त्यानंतर या सर्वावर वरताण करणारे आले हे एआय. याची मोहिनी अनेकांना पडलीय ते स्वाभाविक आहे कारण या तंत्रज्ञानात काय नाही ते विचारा. त्यामुळे अगदी उच्च विद्याभूषित देखील याकडे वळले आहेत.अर्थात चांगल्या अर्थाने आणि चांगल्या विचाराने वापरलं गेलं तर एआय हे नक्कीच वरदान ठरू शकेल असं वाटत असतानाच त्याचे दुसरे रूपही वेगाने समोर येतेय.जे अतिशय भयानक आहे.

या एआय मध्ये नेमकं होत काय ? तर तुमच्या मनात जे काही असेल त्याचा तपशील एआय प्रणाली मध्ये फीड केला अन कमांड दिली की अवघ्या काही सेकंदात तुम्हाला जे हवं ते तुम्हाला एआय हजर करतं.म्हणजे समजा अमिताभच्या चेहऱ्याला धर्मेंद्रचा लाव असं सांगितलं तर आधीच्या काळी फोटोशॉप मध्ये ते काम केलं जायच मात्र ते तितकं फिनिश्ड नसल्याने लगेच लोकांना ओळखू यायच.पण आता एआय फोटो एडिटिंग आणि क्रियेटिंग मध्ये इतकं प्रचंड विकसित झाले आहे की तुम्हाला मूळ चित्र कोणतं आणि डुप्लिकेट हे कितीही झूम करून पाहिले तरी कळणार नाही इतकं फिनिश्ड लेव्हलचे काम यात होत आहे अशी इतरही विविध कामे करतोय.एआय भविष्यात आणखी काय काय घेऊन येणार आहे याची कल्पनाही करवत नाही.त्यातून कोणीही सुटू शकणार नाही तर असे हे एआय चे फक्त एक टक्का रूप आहे. सुरुवातीलाच मी म्हटलं तस हे की एआय म्हणजे दुधारी तलवार आहे. योग्य व्यक्तीच्या हाती पडली तर पराक्रम घडवून इतिहास रचू शकतील पण वाईट हाती पडली तर नरकयातना आणि विध्वंस नक्की.

तुम्ही म्हणाल की मग आता काय करायच ? सगळं बंद करून रानावनात पुन्हा गुहेत जाऊन राहून कंदमुळं खात जगायच का ?तेच बाकी शिल्लक आहे ,तर मंडळी असेहीं काही नाही. मी नेहमी सांगतो तसे पूर्वी लोक पायी प्रवास करायचे अथवा बैलगाडीने. त्याकाळात ॲक्सीडेंन्टचे प्रमाण अगदीच नगण्य होते,म्हणजे जणू नव्हतेच.पण आता वेगवान कार्स आल्या, त्यामुळे ॲक्सीडेंन्ट वाढले पण म्हणून आपण प्रवास करणे / गाडी चालवणे बंद नाही केले तर आता अधिक सावधगिरीने चालवतो.अगदी तसेच एआय बद्दल आणि एकूणच सोशल मीडिया बद्दल वागायचे आहे.हा सोशल मीडिया आहे त्यामुळे खाजगी जीवन इथं आणू नका.

सोशल मीडियावर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे विशेषत महिलांचे फोटो पोस्ट करणे शक्यतो टाळा.कारण त्याचा मिसयुज एआय च्या मदतीने होऊन नंतर पुढं ब्लॅकमेल बदनामी असं चक्र सुरु होऊ शकते. तसेच अजून एक म्हणजे सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही फोटो व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नका.अन घाईत रिऍक्ट होऊन फॉरवर्ड करत बसू नका. थोडा वेळ थांबा… गुगलवर अथवा इतर सोअर्सवर नीट त्याबद्दल शोधा.तेव्हा आपोआपच कळेल की ते सत्य आहे की फेक.तेव्हा सावध राहा मंडळी सजग राहा. जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी व डॉ.धनंजय देशपांडे,पुणे यांनी केले आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading