कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल
सोलापूर ,२३/०१/२०२५-आरोपी लोकसेवक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल, वरिष्ठ मुख्य लेखनीक,(वर्ग-३) नेमणूक कर विभाग, सोलापूर महानगरपालिका सोलापूर, रा. घर नंबर १०११ / १०१२ भाग्यनगर, प्रगती चौक, जुना विडी घरकुल सोलापूर जि. सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारुन मधून २१.२५५/- रुपयांची कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत २८,७४५/- रुपये लाच रक्कम स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिट,पुणे परिक्षेत्र अंतर्गत सदर बझार पोलीस ठाणे,सोलापूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आरोपी लोकसेवक वरिष्ठ मुख्य लेखनीक,(वर्ग-३) चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल नेमणूक कर विभाग,सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम ५०,०००/- रुपये यात स्विकारलेली लाचेची रक्कमेची पडताळणी व यशस्वी सापळा कारवाई दि. २३/०१/२०२४ रोजी करण्यात आली.
यातील तक्रारदार यांनी सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये ३००० स्क्वेअर फुट जागा नोटरी पध्दतीने खरेदी केलेली असुन सदर जागेच्या कर आकारणीस नावाची नोंद करणेसाठी कर विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे अर्ज सादर केला असून, सदर अर्जाचे अनुषंगाने यातील तक्रारदार हे पाठपुरावा करत होते.या संदर्भात तक्रारदार हे कर आकारणी व कर संकलन विभाग महानगर पालिका सोलापूर येथील वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोंतुल यांची भेट घेतली असता, नमुद लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या जागेचा ०१/०४/१९९२ पासुन ते ३१/०३/२०२५ पावेतोचा कायदेशीर कर एकुण १,७७,७४५/- रुपये भरण्यास सांगितले व तेवढा कर भरायचा नसेल तर ५०,०००/- रुपये देण्यास सांगून त्यामधून ०१/०४/१९९२ ते ३१/०३/२०२५ २०२५ पावेतोचा कर भरल्याची पावती देतो असे सांगुन तक्रारदार यांच्याकडुन ५०,०००/- रुपयांचा स्विकार करुन त्यापैकी २१२५५/- रुपयांची ऑनलाईन कर भरल्याची पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत २८.७४५/- रुपये लाच रक्कम स्वरुपात स्वतः करीता स्विकारले.
यावर पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे ला.प्र.वि.पुणे., अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.डॉ.शीतल जानवे/खराडे, पुणे पर्यवेक्षण अधिकारी,पोलीस उपअधीक्षक, एसीबी गणेश कुंभार सोलापूर यांच्या मार्गदर्शानाखाली सदरची कारवाई सापळा पथकातील पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक एसीबी सोलापूर पोलीस अंमलदार पो.हे.कों.अतुल घाडगे, सलिम मुल्ला, स्वामीराव जाधव,पो.शि.राजू पवार,चा.पो. ह.राहुल गायकवाड सर्व नेमणूक ला.प्र.वि., सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकां बद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज, रंगभवन चौक, सोलापूर.
संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.inऐ
ई मेल- www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार ॲप acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक १०६४
दुरध्वनी क्रमांक- ०२१७-२३१२६६८
व्हॉटस ॲप क्रमांक- ९९३०९९७७००
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
