लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळेल –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.16 : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की,राज्य शासनाने मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डीबीटी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे.यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading