खासदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा, संजवाड, बंकलगी गाव भेट दौरा

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ जानेवारी २०२५- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा, संजवाड, बंकलगी गाव भेट दौऱ्यानिमित्त ग्रामस्थांची भेट घेतली. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना गावकऱ्यांच्या अपेक्षा आणि अडचणी समजून घेतल्या आणि सोडविण्याची ग्वाही दिली.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, तालुका अध्यक्ष हरिष पाटील, सरपंच तांदुरे, अमोगसिद्ध बुलगुडे, नागनाथ कोंडदी, रणजित देशमुख, सूर्यकांत जगताप, मल्लिकार्जुन चंडके, हणमंतू वाघमारे, राजशेखर सगरे, काशाप्पा कोंडदे, कृष्णा शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

या भेटी दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.गावाच्या प्रगतीसाठी मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे वचन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
