म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु – अध्यक्ष नितिन दोशी

म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु – अध्यक्ष नितिन दोशी यांची माहिती

म्हसवड ता.माण/ ज्ञानप्रवाह न्यूज – म्हसवड ता.माण येथील मोफत नगरवाचनालयामध्ये दि.01/01/2025 ते 15/01/2025 या कालावधीत वाचन संकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रभर वाचन संकल्पाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांचे सुचनेप्रमाणे येथील वाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु करणेत आल्याची माहिती मोफत नगर वाचनालयाचे अध्यक्ष व म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी दिली.

वाचनालयातील सर्व पुस्तकांची, इमारतीची स्वच्छता करण्यात आली तसेच पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले. त्याचा असंख्य साहित्यप्रेमींनी लाभ घेतला.वाचनालयाची गोडी निर्माण व्हावी व वाचकांनी ग्रंथालयाकडे वळावे यासाठी असे उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी विषद केले.

यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक प्रशांत सूळ , सिद्धनाथ हायस्कुल व ज्यूनी.कॉलेज वाचनालायचे ग्रंथपाल भारत पिसे सर, डॉ.दोशी, लोखंडे,विपुल व्होरा,मोफत नगर वाचनालयाचे ग्रंथपाल सुनिल राऊत व म्हसवड परिसरातील वाचक उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading