आमदार अभिजीत पाटील यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेची भेट
माढा शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी मिळावा आमदार पाटील यांची मागणी
माढा / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसेभेचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे याची मुंबई येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे पत्र दिले. माढा येथे जिल्हा परिषद जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आवश्यक निधी मिळावा याकरिता ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले.

माढा शहरामधील जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये २ मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार झाल्यावर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व अनेकांना रोजगार उपलब्ध होईल.

तसेच जागेतील आतील बाजुस क्लासरूम व शाळेसाठी वॉल कंपाऊंड तयार करणेही गरजेचे आहे.त्यासाठी आवश्यक निधी मंजुर करण्यात यावा,अशी मागणी केल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
