म्हसवड परिसरामध्ये त्या बॅनरचीच चर्चा

म्हसवड परिसरामध्ये त्या बॅनरचीच चर्चा

म्हसवड ता.माण जि.सातारा/ ज्ञानप्रवाह न्यूज- नुकत्याच पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये महायुती ला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले.महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आत्तापर्यंत चा सर्वात मोठा कौल होता.यामध्ये माण खटाव मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जयकुमार गोरे हे जवळ जवळ 50 हजार मतांनी निवडून आले. त्यांनी मिळवलेले हे चौथे यश होते.

आमदार जयकुमार गोरे हे सलग चार वेळा आमदार झाले. त्यांनी मारलेला हा विजयी चौकार विरोधकांच्या काळजात धडकी भरवणारा होता.त्यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये सर्वांच्या नजरेत भरणारा भावी मंत्री साहेब हा बॅनर माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी लावला होता.

निवडणूक निकाल लागल्यानंतर माण खटावचे आमदार मंत्री व्हावेत असे सर्वांनाच वाटत होते.परंतु म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी या बॅनर द्वारे जयकुमार भाऊ हे मंत्री होणारच असे दृढनिश्चयाने सूचित केले होते.त्यांनी तो बॅनर आपल्या दुकानसमोर लावला होता आणि आमदार जयाभाऊंना मंत्रिमंडळ शपथविधी दिवशी सकाळीच मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपा पक्ष कार्यालयातून फोन आला आणि भाऊ नामदार झाले त्यामुळे या बॅनरची सर्वत्रच चर्चा झाली.अनेक मान्यवरांनी नितीन दोशी यांना भेटून, फोनद्वारे त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading