गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली; घटना दुर्दैवी
दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. १८ : मुंबई येथील गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल असे, निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
