शनिवार विना दप्तर शाळा या उपक्रमांतर्गत दातांची काळजी या विषयावर डॉ अनुराधाताई तुषार खंडागळे यांनी केले मार्गदर्शन

शनिवार विना दप्तर शाळा या उपक्रमांतर्गत दातांची घ्यायची काळजी या विषयावर डॉ अनुराधाताई तुषार खंडागळे यांनी केले मार्गदर्शन

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर येथे संस्थापिका सौ.सुनेत्राताई पवार यांच्या संकल्पनेतून मुलांच्या दातांच्या समस्या व उपाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेने करण्यात आली.डॉ अनुराधाताई खंडागळे यांचा सन्मान सौ गावडे मॅडम यांनी शाल,रुमाल गुच्छ देवून केला.

आपल्या मार्गदर्शनात डॉ.अनुराधाताई म्हणाल्या दिवसातून दोन वेळा स्वच्छ दात घासावेत. त्याचबरोबर काही अन्नपदार्थ खाल्ल्यास लगेच चूळ भरावी. वर्षातून एकदा दातांच्या डॉक्टरांकडे आपले दात दाखवावेत.

प्रश्नोत्तर मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले.अर्णव शिंदे श्लोक पतंगे,दिव्या पतंगे,आरोही खंकाळ,तनिष्का डांगे यांनी डॉक्टरांची मुलाखत घेतली.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading