पंढरपूरात आंतरराष्ट्रीय दत्तक जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार वा.बा. नवरंगे बालकाश्रम पंढरपूर या संस्थेने पंढरपूरात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय दत्तक जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

राष्ट्रीय पातळीवर नोव्हेंबर महिना दत्तक महिना म्हणुन साजरा केला जातो.याचे औचित्य साधून,वा.बा.नवरंगे बालकाश्रम या दत्तक संस्थेने पोस्टरव्दारे कायदेशीर दत्तक प्रक्रिया, सुरक्षित प्रक्रिया याबद्दल जनजागृती केली.पंढरपूर येथील हॉस्पीटल, रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टॅन्ड आदी सार्वजनिक ठिकाणी तसेच पोलीस स्टेशन येथे जनजागृती माहिती फलक लावण्यात आले.
सदर संस्था गेली 149 वर्षे झाली मुलांचे दत्तक व पुनर्वसनचे काम करत आहे. कोणतेही बालक परस्पर दत्तक देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे यासाठी https://cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी व 1800111311 या हेल्पलाईनवर सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत पर्यंत माहिती घ्यावी तसेच संस्थेत आल्यास सर्व माहिती देण्यात येईल अशी माहिती दिली.

बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया धोकादायक आहे, त्याला पुढे जाऊन अनेक अडचणी येतात, त्याकरीता केंद्राने निर्माण केलेल्या ‘cara’ या एजन्सीव्दारे आपले कायदेशीर दत्तक प्रक्रिया करावी असे आवाहन केले. तसेच या आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्याचा उद्देश Foster care and Foster care Adoption या निमित्त बालगृहात प्रवेशित अनाथ,निराधार, निराश्रीत इत्यादी प्राधान्याने मोठ्या वयोगटातील बालकांना प्रतिपालकत्व या योजनेचा लाभ मिळवून देणे हा आहे. असे संस्थेच्या अधिक्षिका राजश्री गाडे यांनी यावेळी सांगितले
सदर माहिती फलक प्रदर्शन जनजागृती कार्यक्रमात संस्थेचे धर्मराज डफळे,सुचित्रा पवार,मीरा बडकस या सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
