माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार : आमदार अभिजीत पाटील

निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार

माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार : आमदार अभिजीत पाटील

आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले रायगडावर छत्रपती शिवरायांचे दर्शन आणि वंशजांची भेट

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मुंबई येथील तीन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक झाले.निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार अभिजीत पाटील हे आहेत.

रायगडाच्या पावन स्थळावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता.याच ठिकाणी स्वराज्याचा संकल्प पूर्ण केला होता.या ठिकाणी छत्रपतींचे अनेक वर्ष वास्तव होते. या पवित्र ठिकाणी जाऊन आमदार अभिजीत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.

यावेळी अभिजीत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की छत्रपतींनी हजारो मावळे घडवले आणि स्वराज्याची संकल्पना रुजवली. त्यांच्या प्रेरणेने पुढील पिढ्या घडल्या मराठा साम्राज्याने बलाढ्य शक्तींना परास्त करत अटकेपार झेंडा रोवला. संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्याच्या आदर्श संकल्पनांवर उभा राहिला आहे.मला देखील माढा विधान सभेची मिळालेली जबाबदारी एक मावळा म्हणून पूर्ण करायची आहे असा संकल्प करून आमदार अभिजीत पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करून आर्शीर्वाद घेतल्याचे सांगितले.

ते पुढे बोलताना म्हणाले की ,माढा मतदार संघात या परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार आहे. माढा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकही अश्वारूढ पुतळा नाही ही खंत कोणाच्याही मनात राहू देणार नाही असा विश्वास दिला. आमदार अभिजीत पाटील यांनी रायगडावर छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचा इतिहास जाणून घेत असताना महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे देखील योगायोगाने रायगडावर आले होते. यावेळी अभिजीत पाटील यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली तसेच रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कार्याबाबत चर्चा केली. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक झालेली भेट आनंददायी ठरली असल्याच्या भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी त्यांचे रायगड दर्शन सुरू असताना एका ठिकाणी शाळेतील विद्यार्थी इतिहास जाणून घेत असताना त्यांना दिसले.त्यामधील एका शिक्षकांनी आमदार अभिजीत पाटील यांना ओळखले आणि संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि योगायोगाने भेट झालेले स्वराज्याचे वंशज यांच्याशी संवाद साधता आल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी रायगडावर इतिहास जाणून घेण्यासाठी काढलेल्या अशा संस्कारित सहलीसाठी शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे छत्रपती आणि भविष्यातील अनेक बालक छत्रपती यांची एकत्रित भेट म्हणजे इतिहास वर्तमान आणि भविष्य याचे एकत्रित दर्शन घेऊन नवी ऊर्जा घेऊन परतलो असल्याच्या भावना आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केल्या.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading