युवा महोत्सवाच्या माध्यमा तून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळतो-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

स्पर्धांमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विविध विषयांचे प्रदर्शन ठरले आकर्षण

1परभणी,दि.७/१२/२०२४,जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आज बी रघुनाथ सभागृह येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.महोत्सवास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक स्पर्धांतर्गत समूह लोकनृत्य व लोकगीत,अंतर्गत चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व कौशल्य विकास स्पर्धा कविता वाचन, कथालेखन, तर संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना इत्यादी विविध प्रकारात स्पर्धा संपन्न झाल्या.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे,राज्य युवा पुरस्कारार्थी काजल भुसारे,प्रा.डॉ.सुरेश शेळके, डॉ.सुरेश हिवाळे,डॉ.संतोष वाकडे,डॉ.श्रीकांत पेंडलवार, मिलिंद बामणीकर,सुनंदा दिगोलकर, डॉ.पंकज खेडकर, रविकुमार पंडित,लक्ष्मी लहाने,अब्दुल कुरेशी,भाग्यश्री जोशी,पुनम मारवा,सरोज देशपांडे आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही सहभागी युवांना प्रोत्साहन देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.आपला देश विविध कलागुण,संस्कृतीने नटलेला आहे.अशा युवा महोत्सवाच्या माध्यमातून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळतो. ही उल्लेखनीय संस्कृती जतन करणारी बाब आहे.मिळालेल्या संधीचं कलाकारांनी सोनं कराव,असे त्यांनी आवाहन केले.विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक कविता नावंदे यांनी केले.

यावेळी एमपीएससीद्वारे कल्याण पोले यांची तालुका क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती झाल्यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

या महोत्सवांतर्गत विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लोकगीत व लोकनृत्य यांचे सादरीकरण पाहिले व सायन्स विज्ञान याबाबतीत इनोवेशन प्रदर्शन, चित्रकला, कथालेखन, कविता लेखन या सर्व समूहांना प्रत्यक्ष भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले.सूत्रसंचालन अतुल वैराट यांनी केले.

दि.12 डिसेंबर रोजी नांदेड येथील राज्य युवा महोत्सवात सर्व युवा कलाकार सहभागी होणार आहेत.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील नानकसिंग बस्सी, श्री.मुंडे,कल्याण पोले,रोहन औंढेकर,सुरेश नाटकर,रमेश खुणे,भागवत,प्रकाश पंडित,धीरज नाईकवाडे,योगेश आदमे यांनी परिश्रम घेतले.

  1. ↩︎

Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading