[ad_1]

Srinagar News : जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरच्या दाचीगाम जंगलामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीमध्ये दहशदवादी ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. काश्मीर झोन पोलिसांच्या मते विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी दाचीगाम जंगलाच्या वरच्या भागात कासो सुरू केला आणि संपर्क स्थापित केला गेला. तेव्हापासून ही कारवाई सुरूच आहे. मागील महिन्यात जम्मू-कश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षादलने केलर जंगल परिसरात दहशदवाद्यांच्या एका एक गुप्त ठिकाणाचा शोध लावून त्याला नष्ट केले होते. एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी जंगलातुन काही भांडी आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त केल्या. पण त्यापूर्वीच दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली. या भागात दहशतवाद्यांनी तळ ठोकल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांनी या भागात कसून शोध घेतला असता, जंगलात लपलेले हे ठिकाण सापडले. लपण्याचे ठिकाण नष्ट केल्यानंतर, सुरक्षा दलांनी परिसराला पूर्णपणे वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू ठेवली आहे.
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
