[ad_1]

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्याबाबत महाराष्ट्रात सुरू असलेला सस्पेन्स आता संपणार आहे. आज कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र दिसणार आहे. आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आढावा बैठक होणार असून, त्यात तिन्ही नेते उपस्थित राहू शकतात. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
EVM मशीनद्वारे होणारे मतदान आणि 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्याचे निकाल यावर विश्वास नाही. त्यामुळे सोलापूर गावात आज फेरमतदान घेण्यात येत असून, हे मतदान ईव्हीएम मशिनद्वारे नव्हे तर बॅलेट पेपरद्वारे होणार आहे. सविस्तर वाचा
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर युतीचे नेते आपसात भांडत आहे. नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते की, गृहमंत्रालय उद्धव ठाकरे यांच्याकडे असते तर सरकार कधीच कोसळले नसते. त्यावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तीन वर्षे जुने बोलून उपयोग नाही. संजय राऊत स्वतःचे कपडे काढण्यात का व्यस्त आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-assembly-election-2024/jitendra-awhads-response-to-sanjay-raut-s-statement-124120300002_1.html"><strong>सविस्तर वाचा </strong></a></p>
महाराष्ट्रातील नव्या विकासाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. 10 दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स आता पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील. तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार आहे. याशिवाय अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले जाणार आहे. सविस्तर वाचा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. तसेच रविवारी ते नागपुरात होते. जिथे त्यांनी एका कार्यक्रमात 50 गोल्डन रुल्स ऑफ लाईफ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. सविस्तर वाचा
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
