शेळवे येथील खंडोबा याञेस गुरुवारपासून प्रारंभ
शेळवे /ज्ञानप्रवाह न्यूज/संभाजी वाघुले- शेळवे ता.पंढरपुर येथील खंडोबा देवाच्या याञेस ५ डिसेंबरपासून सुरवात होणार आहे.शेळवे येथील खंडोबा याञा ही चार दिवसाची असते.

यात गुरुवार ५ डिसेंबर रोजी राञी देव गावात येतो व खंडोबा देवाच्या छबिन्यासह भेटीचा नयनरम्य कार्यक्रम असतो.
शुक्रवार ६ डिसैंबर रोजी मुख्य याञा आहे. यावेळी संपुर्ण गावातुन व परगावाहुनही खंडोबाचे भक्त वांग्याचे भरीत ,बाजरीची भाकरी व कांद्याच्या पातीचा आगळा वेगळा नैवद्य घेऊन येऊन खंडोबा देवाला दाखवला जातो.याच दिवसी म्हणजे मुख्य याञेदिवसी मंदिरात नयनरम्य गझीढोलाचा पारंपारिक कार्यक्रम साजरा केला जातो.हे गजीढोलच या याञेचे आकर्षण असते.गजीढोलाचे पथकं अनेक गावावरुन आमंञित केलेले असतात.या दिवशी भक्तांनी बोललेले नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी असते.शेळवे खंडोबा याञेत बाहेरगावी स्थाईक झालेले लोकही आवर्जुन खंडोबाच्या दर्शनाला येतात.
शनिवार दि ७ डिसेबर रोजी भल्या पहाटे म्हणजेच दिवस उगवतानाच खंडोबा देवाचा लंगर तोडण्याचा कार्यक्रम असतो .हा लंगर देवाचे पुजारी तोडतात.दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम असतात.
रविवार दि ८ डिसेंबर रोजी सायंकाळी खंडोबा देवाचा छबिना काढून देव गावात जातात आणि याञेची सांगता होते.
गुरुवार २८ नोव्हेबर रोजी खंडोबा देवाचे घटस्थापना झालेली आहे .आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याला शेळवे येथील खंडोबा देवाचे घटस्थापना होते.येथुन पासुन दररोज सकाळी व सायंकाळी खंडोबा देवाचा छबिना काढला जातो.यावेळी भक्तगणाकडून दिवटी म्हणजे तेल किंवा अणसुटाच्या तुपाची दिवटी जाळली जाते.
घटस्थापनेपासुन ते मुख्य याञेचा भरीत बाजरीचा नैवद्य दाखवेपर्यंत शेळवे येथील प्रत्येक घरातील म्हैसीचे दुध विक्री व उसने देणे घेणे बंद असते.या संपुर्ण सात ते आठ दिवसात दुधाचे घटस्थापनेपासुन दररोज दुधाचे ताक करुनच गावात सर्वाना व गोरगरिबांना ते ताक वाटप करायचे असते. यालाच खंडोबाचे अणसुट म्हणतात. या सात आठ दिवसात शेळवे गावात चहाला किंवा लहान बाळांलाही दुध पिण्यास मिळत नाही.
याञेसाठी सर्व ग्रामस्थ ,शेळवे ग्रामपंचायतीने संपुर्ण गावात व खंडोबा मंदिर परिसरात स्वच्छता केली आहे.वीजवितरण कर्मचार्यांनी व वायरमन आखिल मुलाणी यांनी लाईटीचे सर्व कामे पुर्ण केली आहेत असे खंडोबा याञा कमेटी व शेळवे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
